आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
लुटले

घोडेगाव — दि. १५ रोजी सोनई खरवंडी रोडवर कामावरून घरी जात असताना तरुणास लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी राहुल मोहन मोकाटे (वय.२२) रा. खरवंडी रोड सोनई हे येथील सरकारी रुग्णालयातुन घरी जात असताना आरोपी संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर , जेम्स अँन्थनी साळवे दोघेही राहणार राजवाडा सोनई तसेच ओंकार अंकुश साप्ते रा. बेल्हेकरकरवाडी रोड यांनी रस्त्यामध्ये अडवून पैशाची मागणी केली. चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण देखील केली.

लुटले

तसेच चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी, ४०० रुपये रोख रक्कम असा एकुण एक लाख वीस हजार चारशे रुपये काढून घेतले.परत माझ्या घराजवळ येवून तुला जर तुझी अंगठी व दुचाकी पाहिजे असेल तर आम्हाला ४० हजार रुपये दे अशी मागणी केली. तु जर आमच्यावर पोलीस केस केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. या पुर्वी देखील माझ्या विरुद्ध भरपूर केसेस आहे, त्यात अजून एक पडल्याने काही फरक पडणार नाही. मी बाहेर आल्यावर तुझा काटाच काढतो असा दम देवुन निघून गेले.

लुटले

नंतर या तील आरोपी संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर यास वीस हजार देऊन अंगठी व दुचाकीची मागणी केली. परंतु तो तसाच निघून गेला असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा र. नं. २७५/२०२६ बिएन एस चे कलम ३०९(४), ३०८(१), ३०८(७), ३५१(२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस दि. १७ रोजी नेवासा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.

लुटले
लुटले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लुटले
लुटले
लुटले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लुटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!