घोडेगाव– अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही एका १५ वर्षीय मुलीचा सातत्याने पाठलाग करून, तिला धमकावत व विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी पीडित १५ वर्षीय शाळकरी मुलीने शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहून फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी याने तिचा वारंवार पाठलाग केला, तिला मानसिक त्रास दिला आणि धमकी दिली. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या खांद्यावर हात ठेवून तिचा विनयभंग केला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

आरोपीच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने मंगळवार, दिनांक १६ रोजी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली
पीडितेच्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केदार करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







