आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
निखिल जोशी
निखिल जोशी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी नेवासा येथील युवा कार्यकर्ते निखिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. निखिल जोशी यांनी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी आध्यात्मिक आघाडी, नेवासा शहराध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे.

निखिल जोशी

त्यांच्या नियुक्तीबद्दल राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते निखिल जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

निखिल जोशी

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष योगेश गोदकर, भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे, प्रदेश संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, जिल्हा सचिव अशोक टेकने, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश नवले, सुभाष पवार, विवेक अंबाडे, विशाल धनगर, प्रकाश गायके, शुभम सपकाळ यांच्यासह तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निखिल जोशी
निखिल जोशी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निखिल जोशी
निखिल जोशी
निखिल जोशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निखिल जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!