आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वाकचौरे
वाकचौरे

नेवासा – खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेत प्रचंड उलथापालथ होताना दिसतेय. नुकताच उद्धव ठाकरेचा दौरा नियोजित असताना नूतन जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो शिवसैनिकांनी आज सामूहिक राजीनामे देत खा.वाकचौरे यांचं नेतृत्व मान्य करत खऱ्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय, याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मुकुंद सिनगर पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत “निर्धार बैठक” घेतली आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.

वाकचौरे

यावेळी मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, 2014 साली सुद्धा आमच्यासमोर असाच प्रसंग उभा राहिला होता परंतु त्यावेळी पक्षातील वरिष्ठ नेते आणि कक्षाचे तत्कालीन अध्यक्ष शिवसेना नेते सुधीर भाऊ जोशी आणि तत्कालीन सरचिटणीस अरुण जगताप यांनी विश्वास दिल्याने सर्वं पदाधिकारी यांच्यासह पक्षातच राहण्याचा निर्धार केला होता मात्र आत्ता सन्माननीय जिल्ह्याप्रमुखांने वरिष्ठाकडे तक्रारी केल्याने आमच्यावर सतत संशय घेतला जात होता, त्यामुळे पक्षात सन्मानाची वागणूक न मिळाल्याने आत्ता मात्र सामुदायिक राजीनामे देण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पक्षप्रमुखांवर खूप प्रेम आणि नितांत श्रद्धा असतानाही नाईलाजाने निर्णय घ्यावा लागतोय मात्र यापुढे आता आम्ही कुणालाही दोष न देता सर्वं मतभेद विसरून शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ जीं शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच शेकडो शिवसैनिकांसह खऱ्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे.

वाकचौरे

सिनगर यांनी सांगितलं की, गेल्या कांही दिवसांपूर्वी मी सन्माननीय सुजय दादा विखे यांची बदललेल्या राजकारणावरील एक क्लिप पाहली आणि ती मनाला प्रचंड भावली. राजकारणाचा सध्या घसरत चाललेला दर्जा पाहता त्यानुसार खरोखर गेल्या 20 वर्षांपूर्वीच राजकारण हें समाज हितासाठी होतं. मात्र आता स्वार्थासाठी मी मी पणा असणारे नवीन नेतृत्व आमच्या पण पक्षात उदयाला येत आहेत, ज्यांच्यापासून समाजात दुही निर्माण झाली आहे, खरं तर यापासून वैचारिकदृष्ठा राजकारण करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांना धोका आहे. यापुढे जशाच तसं राजकारण करावं लागेल, हें मात्र जरी खरं असलं तरी खरोखर ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आहे, त्या सर्वांच्या मतांचा सन्मान करून त्यांच्या विकासासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत मात्र आमचे कांही सहकारी राजकारणात ठेका घेतल्यासारखी वैफल्यग्रस्त होऊन अत्यंत घाणेरडी टीका करून पुढे जात आहे, त्यांनी आपल्या सोबत कामं करणाऱ्या सहकारी यांना काय दिलंय, याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.

वाकचौरे

यावेळी सिनगर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुळात माझा हा प्रश्न आहे की येणाऱ्या पिढीतील तरुणांच्या हाथात तुम्ही काठ्या देणार आहात की काम? याच विचारावर पक्षप्रमुखांबरोबर काम करणं सुरु होतं मात्र आत्ता पक्षात हाणामारी करणारी संस्कृती पुढे येत आहे. म्हणून माझा नेहमीच आग्रह असतो की हाताला काम देणारं राजकारण करावं ज्यातून समाजकारण होतं आणि सत्तेचे थेट सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत विकेंद्रिकरण होतं, जें मी आजवर सन्माननीय खासदार महोद्यांकडे बघून करत आलोय आणि यापुढेहीं करत राहणार असल्याचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज सर्वांच्या साक्षीने जाहीर करतोय.
म्हणून आम्ही यापुढे शिवसेनेचे खासदार, लोकनेते भाऊसाहेब जीं वाकचौरे यांचं नेतृत्व मान्य करून सामान्य जनतेच्या हिताचं आणि आमच्यासोबत कामं करणाऱ्या असंख्य शिवसैनिकांना जपण्याचं लोकहिताच राजकारण करणार आहोत. सोबत ताकतीने निवडणुका लढवून यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शासकीय समित्यावर आमच्या शिवसैनिकांना पाठवून बळ देणार असल्याचं स्पष्ट केलं.

वाकचौरे

श्री.सिनगर यांनी यावेळी जाहीर आवाहन केले की , जें पूर्वीच्या पक्षातील माझें सहकारी आहेत त्यांनी आता “पेढे वाटा पेढे”
तुम्हाला कायम आमची ऍलर्जी होती. निवडणुकीतही आणि निवडणूक झाल्यापासून आजवर माननीय खासदार साहेबांविषयी कटकारस्थान करत आलेत आणि आता आमच्याविषयीं करण्यास सुरुवात केली होती, तुम्हाला आजवर कधीही वैचारिक बैठका घेता आल्या नाहीत, कधीही सन्मानाने ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेता आला नाही, त्यामुळे आता फक्त मूठभर शिवसैनिक हातात ठेवून राजकारण करता आहात आणि आता तरी आम्ही आशा करतो की यापुढे किमान तुमच्यात तरी समन्वय ठेवा आणि अंतर्गत संघर्ष करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न घेऊन पुढे जा, तुमचं अभिनंदन करू कारण आता आम्ही तुमच्या कामातील अडसर म्हणून स्वतःच बाजूला झालेलो आहोत. मात्र यापुढे वेगळं होऊनही जर आमच्याबरोबरं संघर्ष सुरु ठेवला तर जशाच तसं उत्तर देऊ, अशी कणखर भूमिका घेतली.

वाकचौरे

आम्ही मात्र यापुढे आमच्या शिवसैनिकांसह समाजाभीमुख राजकारण करणार आहोत. माझ्यावर विश्वास ठेवून आलेल्या सर्वं शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुखदुःखात नेहमीच ठामपणे उभा राहील यांची खात्री देतो शिवाय सन्माननीय खासदार महोदयानी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहून ताकद देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

वाकचौरे

त्यामुळे आज माझ्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पक्षाची अंगीकृत संघटना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांचे उपस्थित सर्वं पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देत आहेत, यांची कृपया नोंद घ्यावी.
सर्वांनी आपापले राजीनामे हातात घ्यावीत आणि आपल्या जाग्यावर उभं राहावे, असं आवाहन करून अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला. सततच्या संघर्षामुळे यावेळी असंख्य शिवसैनिक भावुक तर झालेच पण यापुढे कणखर होऊन स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सत्तेच्या दिशेने पाऊल टाकले गेल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाकचौरे
वाकचौरे
वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाकचौरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!