आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पुरस्कार

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पद गाठा; कठोर परिश्रम आणि सातत्य हाच यशाचा मंत्र – पोलीस उपायुक्त गणेश इंगळे

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक रविवार २८ जून २०२६ रोजी शिर्डी येथील शुभारंभ लॉन्स व मंगल कार्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संघटनेचे राज्य सचिव प्रा. विलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण भालेकर, उपाध्यक्ष गोपाल राऊत , धनराज वेलणकर , राजेश नागापुरे, सहसचिव प्रमोद वेलकर माजी मुख्याध्यापक तानाजी शेटे, महिला कार्याध्यक्षा शुभदा धामापूरकर, राज्य संघटक राजकुमार राऊत, प्रवक्ते भाऊसाहेब राऊत, संपर्क प्रमुख भगवान राऊत, संत गोरोबा काका पतसंस्था जामखेड चे अध्यक्ष विनायक राऊत जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर, कार्याध्यक्ष आदिनाथ भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. गणेश इंगळे साहेब (पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड) पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि त्यातील संधी याविषयी बोलताना यशाला कोणताही शॉर्टकट नसतो; कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणताही विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही अपार क्षमता असून, योग्य ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास पोलीस, प्रशासकीय सेवा, तसेच विविध शासकीय क्षेत्रांतील उच्च पदे सहज गाठता येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याचा आणि समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पुरस्कार


राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर म्हणाले कि, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यावेळी समाजातील समाजरत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची जाणीव दृढ व्हावी यासाठी विश्वकर्मा पुराण तसेच ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे नियमित वाचन करावे या ग्रंथांतील विचार विद्यार्थ्यांना ज्ञान, चारित्र्य, संयम आणि समाजसेवेची प्रेरणा देतात.

पुरस्कार


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विलास पवार सर म्हणाले कि, विद्यार्थ्यांना जर कमी वयात व कमी खर्चात नोकरी ला लागायचे असेल तर त्यांनी दहावीनंतर किंवा बारावीनंतर लगेच एअरफोर्स, नेव्हीफोर्स, आर्मी किंवा पोलीस यामध्ये प्रयत्न करावा. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या विद्यार्थ्यांनी जेइ,नीट याची तयारी करून डॉक्टर, इंजिनियर,वकील, किंवा उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जावा. संस्कारशील मुलं व उच्चशिक्षित विद्यार्थी हे समाजाचे वैभव आहे.

पुरस्कार


महादेव बोरुडे (शैक्षणिक) , पंढरीनाथ महाराज राजगुरू (आध्यत्मिक), सुनील लोंढे (उद्योजक) , अशोकराव जाधव (कृषि) , सुभेदार हरी गोरे (माजी सैनिक), युवराज दुधाले (कला), अर्जुन शिंदे (संशोधक), किस्किंदा पांचाळ (नारी शक्ती) आदींना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पदवी, पदविका, दहावी, बारावी व विशेष गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते प्रभू भगवान विश्वकर्मांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांनी प्रास्ताविक केले. सुभाष तमानके व आदिनाथ भालेकर यांनी सूत्रसंचालन केले. तसेच आदिनाथ भालेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्यानगर जिल्हा व तालुका कार्यकारणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

पुरस्कार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!