
सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई येथे एम.एस्सी. – कॉम्प्युटर सायन्स व एम. एस्सी – कॉम्प्युटर एप्लीकेशन हे दोन नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. तसेच संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे एम.एस्सी कॉम्प्युटर सायन्स या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.या पूर्वी एम.एस्सी कॉम्प्युटर एप्लीकेशन कोर्स येथे सुरू झाला आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या दूरदृष्टीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण हे ग्रामीण भागातच घेता यावे या उद्देशाने वरील दोन्ही महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. असे व्यावसायिक कोर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाऊन आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत हा उद्देश लक्षात घेऊन मुळा एज्युकेशन सोसायटी व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देत आहे.

यामधून पालकांच्या खर्चाची मोठी आर्थिक बचत होत असून विशेषत: विद्यार्थिनींना ही सुविधा अधिक उपयुक्त आहे. सोनई येथे संस्थेची विद्यार्थी व विद्यार्थिनीची वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध आहे. संगणक क्षेत्रातील पदवीचे अभ्यासक्रम या पूर्वीच सुरू असल्याने संगणक लॅब, अनुभवी शिक्षकवर्ग, क्रीडा सुविधा, एन सी सी, एन एस एस या बाबी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







