घोडेगाव – नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांनी आता येथील भाविकांची अडवणूक करणाऱ्या कमिशन एजंट वर कारवाईचा बडगा उगारला आहे.

दि. २ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शनी दर्शनासाठी येणाऱ्या शनी भक्तांच्या वाहनांना रस्त्यावर आडवे होऊन त्यांना पुढे जाण्यासाठी प्रतिबंध करून पुजेचे साहित्य आमचेच दुकानातून घेण्याकरीता प्रवृत्त करीत असताना पोलीस ठाण्यासमोरील एका खाजगी वाहन तळासमोरील रस्त्यावर रोहण लक्ष्मण कुसळकर (वय.२४) रा. सोनई, विशाल अरुण काकडे (वय.३७) , भीमराज किसन गव्हाणे (वय.४९) दोघे राहणार शनी शिंगणापूर हे मिळुन आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉस्टेबल रविकांत गर्जे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार बिएन एस चे कलम १२६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सब इंस्पेक्टर कारखेले हे करत आहेत.

शनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक करणाऱ्या कमिशन एजंट वर या पुढे ही कारवाई सुरूच ठेवणार. भाविकांना जर कुठल्याही प्रकारचा त्रास कुणी दिला तर त्याची गय केली जाणार नाही.
– सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे (शनी शिंगणापूर).

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







