आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा


घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोई येथील ‘विश्व लक्ष्मी मंगल कार्यालय, आंबेडकर चौक’ येथे लग्नकार्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन वऱ्हाडी मंडळींवर लाकडी काठ्या, गलोर, मोटर सायकलची चैन आणि लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी महिला आणि त्यांचे नातेवाईक जखमी झाले असून, हल्लेखोरांनी महिलेचे सोन्याचे दागिनेही बळजबरीने ओढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा


​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ जुलै रोजी दुपारी सोनई येथील मंगल कार्यालयात एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संगीता कैलास पालवे (वय ४० वर्षे, रा. धनगरवाडी, ता. नेवासा) व त्यांचे नातेवाईक सामानाची आवरआवर करत होते.
​त्याच वेळी आरोपींनी कोणतीही सबब नसताना अचानक शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपींनी हातातील लाकडी काठ्या, गलोर, मोटर सायकलची चैन आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात फिर्यादी संगीता पालवे आणि सर्जेराव अंकुश पालवे हे गंभीर जखमी झाले आहेत.

गुन्हा


​मारहाण सुरू असताना वाद सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेसोबत आरोपींनी अश्लील वर्तन करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर, गोंधळाचा फायदा घेत फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस आणि सोन्याचे मणी-मंगळसूत्र बळजबरीने ओढून हिसकावून घेतले.

गुन्हा


​ दाखल फिर्यादी नुसार आरोपी राहुल श्रीराम पवार (रा. खडसरखाव, ता. राहुरी), शुभम सोन्याबापू बर्डे करण वसंत माळी, सचिन शिवाजी माळी, अमोल शशिकांत माळी, नवनाथ भिषण माळी (सर्व रा. सोनई, ता. नेवासा)यांसह अनोळखी दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा र. नं. २९४/२०२६ बिएन एस चे कलम ११९(१), ७४,११८(१), ११५(२), ३५२,३५१(२), ३(१) ,८९(२) १९०,१९१,(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबा लबडे हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!