आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्राजक्ता संजय कचरे

नेवासा : कुकाणा ता. नेवासा येथील कु.प्राजक्ता संजय कचरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकाच वेळी तीन महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुकाणा, नेवासा तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ता कचरे यांची दुय्यम निबंधक श्रेणी-१, कर उपनिरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन पदांसाठी निवड झाली आहे.

प्राजक्ता संजय कचरे

एकाच परीक्षेच्या माध्यमातून प्रशासन, नोंदणी व कर विभागाशी संबंधित तीन महत्त्वाच्या पदांसाठी पात्र ठरणे ही त्यांच्या मेहनतीची, सातत्यपूर्ण अभ्यासाची, जिद्दीची आणि गुणवत्तेची उल्लेखनीय साक्ष मानली जात आहे.
प्राजक्ता कचरे यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येय निश्चितीच्या जोरावर हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळवू शकते, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या कामगिरीतून मिळत आहे.

प्राजक्ता संजय कचरे


त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कचरे परिवार, कुकाणा ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता कचरे यांच्या यशामुळे कचरे परिवारासह कुकाणा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही त्यांचे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
कुकाण्याच्या कन्येने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे अभिनंद होत आहे.

प्राजक्ता संजय कचरे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्राजक्ता संजय कचरे
प्राजक्ता संजय कचरे
प्राजक्ता संजय कचरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्राजक्ता संजय कचरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!