नेवासा: महाराष्ट्रामध्ये पावसाने फार मोठा खंड दिला आहे. काही ठिकाणी पाऊस वीस दिवसापासून बिलकुल नाही. त्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. कपाशीची वाढ चांगली नाही. मका व सोयाबीन पिके सुकू लागली आहेत. तुर व बाजरीची परिस्थिती समाधानकारक असली तरी पिकांना पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी अल्प प्रमाणात उपलब्ध आहे त्यांनी पिकांना पाणी पाजण्याची व्यवस्था केली आहे तथापि वीज पुरवठा अल्पकाळ टिकत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

आजच्या प्राप्त स्थितीत कृत्रिम पावसासाठी योग्य वेळ आहे त्यामुळे जल वर्षा प्रकल्पातून कृत्रिम पाऊस प्रयोग करणे हितावह आहे असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे
जून मध्ये अत्यंत पाऊस झाला तथापि जुलै महिन्यातील समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाले आहेत. आज पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते तर काही खरीप पिके पूर्णपणे नष्ट होऊ शकतात त्यासाठी एका संरक्षित पाण्याची खूपच गरज निर्माण झाली आहे . त्यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने कृत्रिम पाऊस प्रयोग करावा अशी विनंती कृषी शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







