सोनई – दि. २६ रोजी सोनई येथील शेती गट नं. २१२/१/ड या ठिकाणी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील रस्ता केस क्रमांक २२/२०२४ च्या निकालाप्रमाणे सोनई हद्दीतील नामदेव भानुदास दरंदले व इतर ३ सर्व राहणार नवनाथ नगर सोनई यांच्या शेतीतील रस्ता खुला करत असताना, भाऊसाहेब एकनाथ दरंदले, राधाकिसन एकनाथ दरंदले, जयवंत एकनाथ दरंदले, बाबासाहेब एकनाथ दरंदले सर्व राहणार सोनई यांनी फिर्यादी मंडळ अधिकारी प्रशांत जनार्दन कांबळे व साक्षीदार विजय केशव जाधव तलाठी यांना ते करत असलेल्या कामात अडथळा निर्माण केला.
तसेच यातील भाऊसाहेब एकनाथ दरंदले याने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. सोनई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ५१६/२०२४ बिएनएस चे कलम २२१,२२६,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.