रस्त्यावर काम करण्यास विरोध करणाऱ्याला पठ्ठयाने दिली जीवे मारण्याची धमकी!
नेवासे (प्रतिनिधी) – भेंडे बुद्रुक (ता.नेवासे) येथील लांडेवाडी शिवारात शेख शेखनूर शेरफोद्दीन रा.भेंडा बुद्रुक यांने चक्क त्याच्या घराचे काम सुरु करतांना ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेताच त्यांनी घराचे काम सुरु करून गावातील वहिवाटीच्या रस्त्याला अडचण निर्माण केल्यामुळे आता चक्क भेंडे बुद्रुक ग्रामपंचायतीने शेख याला समझ पत्र देवून काम बंद ठेवण्याचा लेखी आदेश ग्रामपंचायत अधिकारी आर.टी.भिसे यांनी दिला आहे.
भेंडे बुद्रुक येथील लांडेवाडी शिवारात शेख शेखनूर शेरफोद्दीन रा.भेंडा बुद्रुक यांनी त्यांच्या घराचे काम सुरु केले असतांना या ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता शेख यांनी गावातील चक्क वाहिवाटीच्या रस्त्यावर घराचे काम सुरु करून त्यांच्या शेजारील राहणाऱ्या मार्थाबाई भाऊसाहेब इंगळे आणि मनेष वसंत हिवाळे यांना जाण्या – येण्यासाठी अडचण निर्माण केली असल्याचे या ग्रामपंचायतीने शेख यांना दिलेल्या पत्रात म्हटले असून शेख यांनी वाहिवाटीच्या रस्त्यावर काम सुरु केलेले असतांना याला विरोधात करणाऱ्या मनिष हिवाळे याला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली असून याबाबत नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असतानाही शेख याने चक्क वाहिवाटीच्या रस्त्यावर काम सुरूच ठेवल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वाहिवाटीच्या रस्त्याचा वाद आता थेट पोलिसांत गेलेला असून पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे गावाकऱ्यांच्या नजरा लागून आहेत.







