
नेवासा – तालुक्यातील बाभुळवेडा येथील ज्येष्ठ नागरिक गं. भा. विमलबाई नामदेव शेळके (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच बाभुळवेडा व परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, चार पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या नंदकिशोर शेळके व कालिदास शेळके यांच्या मातोश्री होत. तसेच पी. आर. जाधव यांच्या सासू व माजी आमदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव व अनिल जाधव यांच्या आजी होत.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बाभुळवेडा येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

