
नेवासा तालुक्यातील बाभूळवेढा येथील रहिवासी व नेवासा पंचायत समितीत शिक्षण विभागात कार्यरत असलेले अधिकारी सखाराम उर्फ बाळासाहेब रामभाऊ शेळके यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५७ वर्ष होते.

कै.बाळासाहेब शेळके यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी, एक मुलगा,दोन भाऊ असा परिवार आहे. बाभुळवेडा येथील संजय व राजेंद्र शेळके यांचे बंधू तसेच डॉ. मोहनराव कुटे यांचे जावई,शेतकरी नेते पी.आर.जाधव यांचे मेव्हणे,माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव व अनिल जाधव यांचे ते मामा होते त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







