आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्रवरासंगम

संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीना जागीच ठेचा – शुभम उगले

प्रवरासंगम

प्रवरासंगम – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांसह इतर वीस संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडेच्या प्रतिमेला शिवसेना प्रणित युवा सेनेच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. संतांबद्दल टीका व अपमान सहन करणार नाही अशा व्यक्तींवर योग्य ती कडक कारवाई होण्यासाठी रस्त्यावर येऊ,संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीना जागीच ठेचा असे आवाहन युवा सेनेचे नेते उद्योजक शुभम उगले पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.

प्रवरासंगम


प्रवरासंगम येथील बाजारतळ प्रांगणात हनुमान मंदिरासमोर शिवसेना प्रणित युवा सेनेच्या वतीने झालेल्या निषेध सभेत त्रिव भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा हे लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान आहे, त्यांनी दिलेल्या शिकवणी नुसार भरकटलेल्या व्यक्ती निर्व्यसनी जीवन जगून सुखी संसाराकडे वाटचाल करू लागले आहे यामध्ये अशा विकृत स्वरूपाच्या व्यक्तींकडून होत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे समाजातील वातावरण दूषित होत असते म्हणून अशा प्रवृत्ती जागीच ठेवल्या पाहिजे अशी भावना युवा सेनेचे नेते शुभम उगले पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

प्रवरासंगम


   यावेळी झालेल्या निषेध आंदोलन प्रसंगी युवा सेनेचे शुभम उगले पाटील यांच्यासह हिंदू धर्म प्रचारक गजानन गवारे, माजी सरपंच राहुल लकारे,उपसरपंच काका खंडागळे, दीपक आव्हाळे,उदय पांडव,चंद्रकांत गायकवाड,भाऊराव गायकवाड,पप्पू गोत्राने,विशाल पांडव,रविंद्र फाजगे, अक्षय म्हस्के,दीपक रेलकर,अशोक वाकचौरे, सतीश तिडके उपस्थित होते.

प्रवरासंगम
प्रवरासंगम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रवरासंगम
प्रवरासंगम
प्रवरासंगम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रवरासंगम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!