घोडेगाव – नेवासा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, घोडेगाव येथील शिवसेना नेते पंकज लांभाते यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

रविवारी (दि. २६) ठाणे येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेचे उपसभापती आ. सचिन आहेर, आमदार विजय शिवतारे, रावसाहेब (नाना) खेवरे, हरिभाऊ शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पंकज लांभाते यांनी नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. विकासाला प्राधान्य देत जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. लांभाते यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या प्रवेश सोहळ्यास संदीप येळवंडे (मा.उपसरपंच), राजेंद्र येंळवडे (ग्रा.पं.सदस्य), कल्याण इखे, ज्ञानेश्वर ढवाण, अशोक जाधव, संतोष लाटे, नारायण ढवाण, बाबासाहेब इखे, शरद कदम, सागर ढवाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत नेवासा तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







