आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आषाढी एकादशी

घोडेगाव, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव येथील साप्ताहिक बाजारात उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून उपवासाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. धार्मिक उत्साहामुळे रताळे, केळी, बटाटे, साबुदाणा, शेंगदाणे, साखर आदी साहित्याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. यंदा घोडेगाव बाजारात गावरान व बेळगाव रताळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून किरकोळ बाजारात रताळ्यांना प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये दर मिळत आहे. तसेच बटाटे २५ ते ३० रुपये प्रतिकिलो, तर केळी ३० ते ४० रुपये डझन या दराने विकली जात आहेत.

आषाढी एकादशी

वाढती मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर रताळ्यांची आवक केल्याने ग्राहकांना ताजा आणि दर्जेदार माल सहज उपलब्ध झाला. सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनी उपवासासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली. अनेकांनी रताळ्यांसह बटाटे, केळी, साबुदाणा, शेंगदाणे, साखर आणि इतर उपवासाच्या साहित्याची खरेदी केली. आषाढी एकादशीच्या उपवासात रताळ्याला पौष्टिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणून विशेष महत्त्व असल्याने दरवर्षी या काळात त्याची मागणी वाढते. यंदाही चांगल्या दर्जाच्या रताळ्यांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली.

आषाढी एकादशी

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रताळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने वाढलेल्या मागणीचा दरांवर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार माल मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने घोडेगाव बाजारात धार्मिक वातावरणाबरोबरच व्यापारालाही चांगली चालना मिळाली असून उपवासाच्या साहित्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून आले.

आषाढी एकादशी
आषाढी एकादशी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आषाढी एकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!