घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई च्या सुचना केल्या होत्या त्यानुसार अहील्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संतोष मुटकुळे यांनी या कामी एक स्वतंत्र पथक नेमुन सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई चे आदेश दिले.

त्यानुसार दि. २७ रोजी .परिसरातुन मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेर गावचे शिवारात पानेगाव रोडवरील हाॅटेल पाटील वाडा मध्ये लकी जितमन राणा (वय.२६) रा. अस्तगाव ता. राहता तसेच हाॅटेल सावली येथे प्रकाश बाळु भोसले (वय.३४) रा.निंभारी हे दोघे आपल्या हाॅटेल मध्ये विविध कंपन्या असलेली विना परवाना दारू विक्री करतांनी मिळुन आले . त्या ठिकाणाहून १९.७०० रुपयांची विविध कंपन्या असलेली दारू जप्त करण्यात आली. घोडेगाव ते छत्रपती संभाजी नगर रोडलगत असलेल्या हाॅटेल चिराग येथे अल्ताफ इस्माईल शेख (वय.४२) रा. घोडेगाव हा विना परवाना दारू विक्री करताना मिळुन आला.

१९३० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. सोनई खेडले रोडवरील हाॅटेल साम्राज्य येथे निवृत्ती कर्णासाहेब होन रा. (वय.३०) रा शिरेगाव हा देखील १७२० रुपयांची विना परवाना दारू विक्री करताना मिळुन आला. असा एकुण २३.३५० रुपयांची विना परवाना दारू जप्त करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस काॅस्टेबल योगेश कर्डीले यांच्या फिर्यादी वरुन महा. दारू बंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







