घोडेगाव —नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा केवळ एक उत्सव नाही, तर सामाजिक समतेचा आणि न्यायाचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी भारतीय समाजाला नवे भान दिले. त्यांच्या कार्यामुळेच आपण आज समानतेच्या मूल्यांवर आधारित समाजात उभे आहोत. १४ एप्रिल हा दिवस त्यांच्या महान योगदानाची आठवण करून देतो.

हा दिवस आपल्याला शिक्षण, स्वाभिमान आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतो. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
आज किड्स किंगडम अकॅडमी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या वेळी मुख्याध्यापिका किर्ती बंग सह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करताना विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी (छाया.प्रणव बेल्हेकर)


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







