
घोडेगाव— नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पुर्व वैमनस्यातून दोन दुचांकिसह जनावरांचा चारा पेटविण्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी नितीन शिरसाठ याचा खुन केल्याचा राग मनात धरून मित्र शाहरुख ऊर्फ चाट्या शेख , बबलू जयसिंग लोंढे, राकेश विशाल आल्हाट, करण ऊर्फ बुट्या भांडालकर, विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे, बालु तेलधुने, सर्व राहणार घोडेगाव यांनी झापवाडी रोडने येऊन आमच्यावर दहशत व जरब बसावी या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकून काडेपेटीच्या सहाय्याने मोटारसायकल सह जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान केले आहे.

तशी फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दि. १५ रोजी सचिन साहेबा फुलमाळी (वय.२८) यांनी दिली आहे. त्या नुसार गुन्हा र. नं. १३७/२०२६ बिएन एस चे कलम ३२४(५), ३२४(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







