घोडेगाव— घर बांधणीसाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत या साठी विवाहित महिलेचा छळ करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी संगिता आण्णासाहेब फुलमाळी (वय, २७) हल्ली राहणार चांदा. हिचा दि. १३ जुलै २०१६ रोजी अण्णासाहेब गंगाराम फुलमाळी रा. रुईछत्तीसी याच्या सोबत विवाह पार पडला होता . लग्नानंतर तीन वर्षापासून ते दि. २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सासरी नांदत असताना( पती )आण्णासाहेब गंगाराम फुलमाळी,( सासू) मालण गंगाराम फुलमाळी,

(सासरे) गंगाराम यंकु फुलमाळी,( भाया)उत्तम गंगाराम फुलमाळी, (जाव) अलका उत्तम फुलमाळी,( दिर) सुनील गंगाराम फुलमाळी,(नणंद )संगिता सुरेश गायकवाड सर्व राहणार रुईछत्तीसी यांनी फिर्यादीस घर बांधणीसाठी माहेरून दहा लाख रुपये आणावे या साठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करत उपाशीपोटी ठेवण्यात आले. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी देखील मारहाण करण्यात आली असल्याचे दि. २२ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा र. नं. १४४/२०२६ बिएन एस चे कलम ८५,११५(२), ३५२,३५१(२)(३),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.




कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







