
सोनई – सोनई येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगदंबा मातेस जलाभिषेक करण्यात आला.

त्यानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख व अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख यांच्या हस्ते महाआरती पार पडली.
यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, सोनईची जगदंबा देवीची यात्रा ही मोठी परंपरा असलेली असून या उत्सवाच्या निमित्ताने गावातील सर्व नागरिक एकत्र येतात. त्यामुळे गावाचा एकोपा जपला जातो आणि विचारांची देवाणघेवाण घडते.

सर्वांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे व उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले
सर्वाना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख, माजी सरपंच हरिभाऊ दरंदले, भाऊसाहेब निमसे, बाळासाहेब बनकर, बाबा अनारसे, राजेंद्र बोरुडे, प्रकाश शेटे, उदय पालवे, डॉ. माऊली दरंदले,उपसरपंच प्रसाद हारकळे, आप्पासाहेब निमसे, कल्याण गडाख, वसंतराव कुसळकर, मच्छिंद्र कुसळकर, सचिन गर्जे, महावीर चोपडा, डॉ. रामनाथ बडे, रणजित जाधव, सुभाष निमसे, संजय गर्जे, राहुल राख, विकी राऊत, सचिन भागवत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







