आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अभिष्टचिंतन सोहळा
अभिष्टचिंतन सोहळा

पानेगाव | अविनाश जाधव – नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे सौ. कांताबाई व श्री. नामदेव विश्वनाथ जंगले यांनी चारधाम यात्रा पूर्ण करून जीवन यशस्वी केले. त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व हरिकीर्तन सेवा पार पडली. या कार्यक्रमाला ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के प्रमुख उपस्थित होते.हरी कीर्तनात संत तुकाराम महाराजांच्या “आता माझ्या भावा/ अंतराय नको देवा” या अभंगावर निरूपण झाले. गुरुवर्य म्हस्के बाबांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य व यात्रेचे महत्त्व यावर विवेचन केले.

अभिष्टचिंतन सोहळा

तसेच संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा येथून प्रारंभ होणाऱ्या पालखी सोहळ्यात पानेगावकर दिंडीने सहभागी व्हावे, परिसरातील दिंड्यांनीही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी ह.भ.प. आदिनाथ महाराज भोगे, युवा कीर्तनकार ह.भ.प. सागर महाराज टेमक, चंद्रकांत महाराज जाधव, संजय महाराज लांडे, भाऊसाहेब महाराज लांडे, भारत महाराज जंगले, गणेश महाराज पंडित तसेच माजी सभापती सुनीलभाऊ गडाख उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन नामदेव जंगले, गणेश जंगले, सुनील जंगले व अनिल जंगले यांनी केले.

अभिष्टचिंतन सोहळा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अभिष्टचिंतन सोहळा
अभिष्टचिंतन सोहळा
अभिष्टचिंतन सोहळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अभिष्टचिंतन सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!