घोडेगाव — नेवासा तालुक्यातील चांदा येथील अवैध दारू धंद्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे.
या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी परिसरातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशे दिलेले आहेत. सदर आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दि, ५ रोजी सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत चांदा गावात हाॅटेल शिवनेरी येथे विजय भानुदास कटारे (वय.२८) रा. पाचेगाव हा विना परवाना विविध कंपन्यांची दारू विक्री करत होता.

या ठिकाणाहून ३८८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदा कौठा रोडवरील हाॅटेल मातोश्री येथे सचिन कडुभाऊ जगदाळे (वय.४२) रा. कौठा हा देखील विना परवाना विविध प्रकारच्या कंपन्या असलेल्या दारूची विक्री करत होता. ६४५० रुपये किंमतीची दारू या ठिकणाहुन जप्त करण्यात आली. संजय आण्णासाहेब भालके (वय.३९) रा. चांदा हा आपल्या हाॅटेल सह्याद्री मध्ये विना परवाना अवैध दारू विक्री करत होता.

३२.६१० रुपयांची विविध कंपन्या असलेली दारू या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. चांदा घोडेगाव रोडवरील हाॅटेल महाराजा येथे बाळासाहेब सुभाष दहातोंडे (वय.४०) रा. चांदा हा विविध कंपन्यांची विना परवाना अवैध रित्या दारू विक्री करत असताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास मिळून आला. ९५५० रुपये किंमतीची अवैध दारू येथुन जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या फिर्यादी वरुन कलम ६५(इ) प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पोलीस करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस हवालदार बाळासाहेब नागरगोजे, पोलीस काॅस्टेबल सतिश भवर, पोलीस काॅस्टेबल मनोज साखरे, पोलीस काॅस्टेबल किशोर शिरसाठ, पोलीस हवालदार योगेश कर्डीले सह चालक भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







