आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नंदीवाले तिरुमल


३ ते ४ हजार समाजबांधवांची उपस्थिती; समाज संघटन, शिक्षण व विकासाच्या प्रश्नांवर भर

नंदीवाले तिरुमल


घोडेगाव— नेवासा तालुक्यातील सोनई येथील जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात नंदीवाले तिरुमल समाजाचा दोन दिवसीय भव्य मेळावा दि. ८ व ९ जुलै रोजी उत्साहात पार पडला. शिवाजी अण्णा पालवे (संभाजीनगर) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मेळाव्याला जिल्ह्यासह नेवासा व इतर तालुक्यांतून सुमारे तीन ते चार हजार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

नंदीवाले तिरुमल


या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते. तसेच नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.मेळाव्यात नंदीवाले तिरुमल समाजाच्या एकजुटीवर, शिक्षणाचा प्रसार, युवकांना रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण, शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आणि समाजाची संघटनात्मक ताकद वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नंदीवाले तिरुमल


यावेळी नंदीवाले तिरुमल समाजाच्या संघटनेच्या निवडी जाहीर करण्यात अध्यक्षपदी एकनाथ गोविंद आटकर पंचायत समिती सदस्य , उपाध्यक्ष शिवाजी अण्णा पालवे संभाजीनगर शिवसेना तालुका अध्यक्ष गंगापूर, सचिव गुलाब दगडू पालवे, बाबासाहेब व्यंकू आव्हाड,, खजिनदार बाबासाहेब व्यंकू आव्हाड, गुलाब चंद्रभान फुल मूवी, काळू हटकर इत्यादींची निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान समाजातील ज्येष्ठांचा सन्मान, युवकांचा सहभाग, महिला उपस्थिती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. विविध तालुक्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने अशा मेळाव्यांचे आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

नंदीवाले तिरुमल


मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी अण्णा पालवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित समाजबांधवांनीही कार्यक्रमाचे नियोजन आणि शिस्तीचे कौतुक केले.नंदीवाले तिरुमल समाजाचा हा मेळावा केवळ धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम न राहता संघटनात्मक बळकटी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती समाजातील ऐक्य आणि संघटनशक्ती अधोरेखित करणारी आहे. नव्या जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रश्न शासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. युवकांचा वाढता सहभाग आणि संघटित नेतृत्वामुळे समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नंदीवाले तिरुमल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नंदीवाले तिरुमल
नंदीवाले तिरुमल
नंदीवाले तिरुमल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नंदीवाले तिरुमल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!