बिबट्या
बिबट्या

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक तालुक्यात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढले असून, यात अनेकदा शेळ्यांचा बळी जात आहे. बिबट्याने गोठ्यात घुसून शेळ्या ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्या

यातच काल रात्री ८ वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निंभारी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदानंद साळे हे गोठ्यात गायीचे दूध काढत असताने अचानक मागून येऊन बिबट्याने शेळीवर हल्ला चढवला.

बिबट्या

या अचानक झालेल्या हल्ल्याने साळे हे घाबरून गेले काही कळायच्या आता शेळी ही बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली अचानक झालेल्या हल्ल्यात शेळी सदानंद साळे हे अवघ्या पाच फूट अंतरावर होते दैव बलवत्तर म्हणून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही ही घटना एकदम गजबजलेल्या परिसरात घडली वन्य प्राण्यांचे पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत.

बिबट्या

दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. वनविभागाने परिसराची पाहणी करून योग्य त्या ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी आग्रही मागणी गावचे सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बिबट्या
बिबट्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बिबट्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!