
आपला जिल्हा – प्रमुख व सत्र न्यायाधीश भगवानराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहिल्यानगर राज्याचे चौथा पटकावला आहे. या लोकअदालतीत एकूण ५९ हजार ४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ५७कोटी ७२ लाख ३९ हजार ४३१ इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या सर्व लोकअदालतींपैकी ही सर्वाधिक यशस्वी लोकअदालत ठरल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या
संयुक्त विद्यमाने जिल्हा जिल्हा न्यायालय तसेच सर्व शिवाजी तालुका यांच्या राष्ट्रीय न्यायालयांमध्ये लोकअदालत आयोजित नुकतीच संपन्न झाली. लोकअदालतमध्ये दिवाणी जिल्ह्याने व फौजदारी प्रकरणे, क्रमांक धनादेश, चेक प्रकरणे, बँक कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन. अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे, कौटुंबिक वाद, महावितरणाशी संबंधितसमझोता प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात आली होती.

जिल्ह्यातील ५६ हजार ७५४ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली तर २ हजार २९४ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. विशेष मोहिमेमध्ये १ हजार २२८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

