घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथील विनापरवाना गावठी दारू अड्यावर अहील्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दि. ९ रोजी कारवाई केली. यामध्ये चांदा ते महालक्ष्मी हिवरे रोडवर सुमंत रावसाहेब थोरात रा. साईनाथ नगर चांदा हा आपल्या राहत्या घरामध्ये विनापरवाना गावठी दारू विक्री करताना मिळून आला. त्या ठिकाणाहून ५००० रुपये किंमतीची ५० लिटर तयार दारू तसेच १५००० रुपये किंमतीचे ३००लिटर कच्चे रसायन असा एकुण २००००(विस हजार रुपये) चा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

कारवाई ची चाहुल लागताच यातील आरोपी फरार झाला. दुसरीकडे शिवाजी दशरथ आढाव (वय.५०) रा. चांदा आढाव वस्ती हा आपल्या वस्तीवर विनापरवाना गावठी दारू विक्री करत होता. ५५०० रुपये किंमतीची ५५लिटर तयार दारू त्याचप्रमाणे १२५०० रुपये किंमतीचे २५० लिटर कच्चे रसायन असा १८००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहील्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात महा. दारू कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






