
घोडेगाव—नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बेकायदेशीर मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कळताच त्या ठिकाणी तात्काळ छापा टाकून एकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी २१ सायंकाळी सुमारे ६.५वाजण्याच्या सुमारास घोडेगाव बसस्टँड शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी फिरोज मुसाबाई शेख (वय ४५, रा. घोडेगाव, ता. नेवासा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११५० रुपयांची रोख रक्कम, विविध दराच्या चलनी नोटा तसेच मटका जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र अडकित्ते हे करत आहेत.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध जुगार व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त जात केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







