घोडेगाव– नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की गेली अनेक दिवसांपासून परिसरात अवैध धंद्यांनी मोठा उतपाथ चालवला होता. त्यामुळे गुन्हेगारी मध्ये वाढ होते होती त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि. ११ रोजी घोडेगाव येथे बस स्थानकासमोरील हाॅटेल दिपक येथे विनापरवाना बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता बेकायदा दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

त्या ठिकाणाहून विविध कंपन्यांची रुपये २४,५६५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादी नुसार बाळासाहेब सातपुते (वय.३४) रा. घोडेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. १८०/२०२६ महा. दारू कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत. दि. ११ रोजी एका पत्र्याच्या टपरी मधे संभा हनुमंत बऱ्हाटे (वय.४२) रा. घोडेगाव हा कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळ खेळताना व खेळविताना मिळून आला. ४६० रुपये रोख रक्कम व खेळण्यासाठी लागणारे साहित्य ठिकाणाहून जप्त करण्यात आले. पोलीस काॅस्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा र नं. १७९/२०२६ महा. जुगार प्रतिबंध कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे करत आहेत. चांदा येथे भानुदास गोटीराम शिंदे (वय.४५) हा एका पत्र्याच्या टपरी मध्ये कल्याण मटका नावाचा जुगार नावाचा हारजीतीचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आला. ८३० रुपये रोख व खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस काॅस्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा र नं. १७८/२०२६ महा. जुगार प्रतिबंध कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत. सोनई ते शनिशिंगणापूर रोडवरील मुळा कारखाना येथे आरोपी संतोष एकनाथ राठोड (वय.४२) रा. शारदा नगर सोनई हा एका टपरी मध्ये बेकायदा विना परवाना गावठी दारू विक्री करत असताना मिळून आला.१८०० रुपये किंमतीची १८ लिटर तयार गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली.

पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा र नं. १७७/२०२६ महा. दारू कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर हे करत आहेत. लक्ष्मण दामु हाटकर (वय.२९) रा. मुळा कारखाना हा देखील येथे एका टपरी मध्ये विना परवाना गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत असताना मिळून आला. १८०० रुपये किंमतीची १८ लिटर तयार दारू असा मुद्दे माल या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा र नं. १७६/२०२६ महा. दा. का. कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस सब इंस्पेक्टर बाबासाहेब लबडे हे करत आहेत. पोलीसांच्या या कारवाई मुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवाल्याचे धाबे दणाणले आहे. या पुढे ही या कारवाया अशाच सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







