
घोडेगाव – दि. ८ रोजी सकाळी ११वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर ते अहील्यानगर रोडवरील घोडेगाव येथील घोडेश्वरी फर्निचर समोर एम एच ३० बि एक्स ०२५७ क्रमांक असलेली दुचाकी दुभाजकावर आदळून जितेश जानु चव्हाण (वय.३७) रा, मलकापूर ता, पातुर हा गंभीररीत्या जखमी झाला होता.

त्याला पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती व फिर्याद चरण जानु चव्हाण (वय.३७) रा. मलकापूर यांनी दि. १८ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्या नुसार गुन्हा र नं. २११/२०२६ बिएन एस चे कलम १०६(१), २८१,१२५(अ), (ब), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







