
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे शेती च्या वाटणी वरुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी दि. १६रोजी संगिता बाबासाहेब कोकाटे (वय.५३) रा. माका या संबधित गुन्ह्यातील आरोपींना म्हणाल्या की आई वडीलांनी जशा शेतीच्या वाटण्या जशा केल्या तशा घ्या असे म्हणाल्या त्याचा राग आल्याने यातील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी तसेच त्यांचे पती, मुलगा यांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी काठ्या फायटर तसेच कोयत्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.

त्याचप्रमाणे गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र व पाच ग्रॅम ची पोत असे एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची दागिने गेले असल्याचे दि. १८ रोजी दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार आरोपी गोकुळ सजन शेंडगे, नवनाथ सजन शेंडगे, बद्रीनाथ बाळासाहेब कोकाटे, बाबासाहेब भीमराज कोकाटे, वर्षा नवनाथ शेंडगे, स्वाती समाधान सोनालकर, बेबी बाबासाहेब कोकाटे, कांता सजन शेंडगे,सजन नाथा शेंडगे सर्व राहणार माका यांच्या विरुद्ध गुन्हा र नं. २०९/२०२६ बिएन एस चे कलम ११९(१), ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) १८९(२), १९१(३) १९०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब तुपे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







