पाचेगाव फाटा – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नेवासा तालुक्यातील पाचेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्रात रविवार दि.२८ जून २०२६ रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच वामनराव तुवर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नागरिकांनी आपल्या लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण राठोड,आरोग्य सेवक पांडुरंग तेलोर,आशा सेविका रेणुका मांजरे,मनीषा साळुंखे, सविता शेळके,सुलतान पटेल,स्वप्नाली औटी,सुशीला जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.पाचेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये २ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते,कारवाडी भागात १ असे एकूण ३ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. एकूण ०ते ५ वयोगटातील ४९३ बालकांची नोंद असून ४३२ बालकांना लसीकरण करण्यात आले होते.उर्वरित ६१ बालकांना घरोघरी जाऊन आरोग्य केंद्र मार्फत लसीकरण होणार आहे.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व बूथवर लसीकरण करण्यात येत होते,लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.नवजात बालकांनाही ही लस देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलिओ हा अत्यंत गंभीर आजार असला तरी वेळेवर लसीकरण केल्यास तो पूर्णपणे टाळता येतो.

प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळविला असला तरी जगातील काही भागांत अजूनही पोलिओची प्रकरणे आढळतात. त्यामुळे सतर्कता कायम ठेवणे आणि प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.पोलिओ हा विषाणूजन्य संसर्ग असून तो प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालकांना बाधित करतो. या आजारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. मात्र, प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत नियमितपणे पोलिओचे दोन थेंब दिल्यास या आजारापासून प्रभावी संरक्षण मिळते असे महत्त्व पटवून दिले.
त्यामुळे कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नये असे पाचेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच वामनराव तुवर यांनी लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. महत्त्व पटवून दिले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







