आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
घोडेगाव
घोडेगाव

घोडेगाव – घोडेगाव जनावरांच्या कर पावतीचा लिलाव दिड वर्षापासुन फिर्यादीचे यांनी घेतलेला होता.यापुर्वी सदरचा लिलाव कृष्णा यल्लपा फुलमाळी व त्याचा भाऊ भारत यल्लपा फुलमाळी दोघे रा. घोडेगाव ता.नेवासा यांच्याकडे होता.

सदर लिलावचे कारणावरुन फिर्यादीचे पती व आरोपी यांचेमध्ये यापुर्वी वाद झालेले होते. दिनांक १२ फ्रेबुरवारी रोजी मयत नितीन विलास शिरसाठ हे घोडेगाव याठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले असतांना त्याचेवर गुलाब सादिक फुलमाळी व इतरांनी गावठी कट्यातुन फायर करुन त्यास जिवे ठार मारले होते.

घोडेगाव

सदर घटनेबाबत सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं.५०/२०२६ बिएन एस चे कलम चे कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३) सह आर्म ऍ़क्ट कलम ३/२५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यात यापुर्वी आरोपी गुलाब सादिक फुलमाळी, सुरज फुलमाळी, आकाश आण्णा फुलमाळी यांना अटक करण्यात आले होते. आरोपी गणेश कारभारी साबळे हा गुन्हा घडल्या पासुन फरार झाला होता.

मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते.

घोडेगाव

नमुद आदेशानुसार पोलीस निरीक्षक. संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, शाहिद शेख, बाळासाहेब नागरगोजे, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, चालक अरुण मोरे, यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.

घोडेगाव

वर नमुद पथक सात दिवसापासुन गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीच्या मागावर होते. पथकाने आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दि. ३ रोजी रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश साबळे हा वाकड, जि. पुणे येथे असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ वाकड,येथे जावुन आरोपीचा शोध घेत असतांना एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव गणेश कारभारी साबळे वय – ३७ वर्षे रा. पानसवाडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

घोडेगाव

त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपी हा कृष्णा फुलमाळी टोळीमधील आरोपी असुन कृष्णा फुलमाळी टोळीविरुध्द यापुर्वी अनेक गुन्हे दाखल आहे.

ताब्यातील आरोपी न गणेश कारभारी साबळे वय-३७ वर्षे रा. पानसवाडी ता.नेवासा यास गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग हे करित आहेत.

घोडेगाव

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

घोडेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घोडेगाव
घोडेगाव
घोडेगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घोडेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!