आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बालगंधर्व
बालगंधर्व

घोडेगाव – शनिशिंगणपूर येथील रहिवाशी असणारे सुप्रसिद्ध गायक सोनु सुरेश साठे यांना बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व परिवाराचे सर्वेसर्वा व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते नुकताच बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. गायक सोनु साठे यांनी गायन क्षेत्रात १६ वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल, संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

बालगंधर्व

करोना काळात आई-वडिलांचे छत्र हरपले. वडील देखील सुप्रसिद्ध गायक होते. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांनी देवीची गाणी, नाथांची, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद , डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,खंडोबा, भारुड, आरती आदीचे गायन केले. त्यांचे प्रसिद्ध असलेले ल ..ला..लीला.. लाला, फाडला शिवबानं अफझल खानाला फाडला , ऐक ना सोन्या माझ्या भावा रापचिक पाखरू घावल , जीव लागलाय माझा झुरणीला हे गाणे विशेष गाजले. याप्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक,ॲक्टर, लावणी कलावंत, गायिका असे अनेक नामवंत कलाकार बालगंधर्व येथे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सोनु साठे यांचे साजन बेंद्रे , अमोल सकट , विलास (आप्पा) तांबे, केशव बनसोडे, रामभाऊ अवघडे , योगेश कांबळे , विजय मोरे आदिसह शनिशिंगणपूर येथील ग्रामस्थ आणि सोनु साठे शिष्य परिवाराने अभिनंदन केले.

बालगंधर्व
बालगंधर्व

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बालगंधर्व
बालगंधर्व
बालगंधर्व

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बालगंधर्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!