घोडेगाव — नेवासा तालुक्यातील चांदा येथे शेतातील काटे काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या फिर्यादीनुसार, रेणुका राजेंद्र दहातोंडे (रा. चांदा) यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपींनी एकत्र येऊन शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी काठीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे, विश्वनाथ जिजाबापू दहातोंडे, गंगूबाई विश्वनाथ दहातोंडे,

वैशाली बाबासाहेब दहातोंडे, सुनीता संतोष कचरे, संतोष एकनाथ कचरे व प्रयाग एकनाथ कचरे (सर्व रा. चांदा) यांच्याविरुद्ध गुन्हा र. नं.३४९/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), १८९(२),१९०,१९१(२),११५(२),३५२,३५१(२)(३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, वैशाली बाबासाहेब दहातोंडे (रा. चांदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतातील काटे व विटा काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात फिर्यादी व तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी सज्जन विठ्ठल दहातोंडे, विठ्ठल संताराम दहातोंडे, राजेंद्र विठ्ठल दहातोंडे, शिवतेज सज्जन दहातोंडे, कविता सज्जन दहातोंडे व रेणुका राजेंद्र दहातोंडे (सर्व रा. चांदा) यांच्याविरुद्ध गुन्हा र. नं. ३४८/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), १८९(२),१९०,१९१(२)११५(२),३५२, ३५१(२)(३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे. सहायक फौजदार मच्छिंद्र अडकित्ते हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







