
नेवासा – दिनांक 05/08/2026 रोजी सकाळी 07.00 वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील देवगाव ते देडगाव जाणारे रोडलगत देडगाव ता. नेवासा येथे महिला नामे राजुबाई अशोक चव्हाण रा. देवगाव ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर ही तिच्या राहते घराचे आडोशाला लोकांच्या आरोग्यास घातक असलेली नशाकारक विषारी गावठी हातभट्टीची दारु विविध रसायने वापरुन तयार करुन तिची विक्री करत आहे.

आता गेल्यास मिळुन येईल अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पो.हे.कॉ/1380 बाबा वाघमोडे, पो.कॉ/967 ज्ञानेश्वर रसाळ, होमगार्ड/वायकर, म.पो.कॉ/1361 गीता पवार, चा.पो.कॉ/पडोळे यांना कारवाई करणेकामी आदेशित केल्याने पो.हे.कॉ/1380 वाघमोडे यांनी दोन पंचांना बोलावुन स्टाफसह नमुद ठिकाणी जावुन महिला नामे राजुबाई अशोक चव्हाण रा. देवगाव ता. नेवासा ही एका लोखंडी टिपाडा जवळ बसुन त्याच्या खाली जाळ घालुन सदर टिपाडातुन एका पाईपच्या सहाय्याने पांढ-या रंगाच्या प्लास्टिकचे ड्रम मध्ये गावठी दारु काढताना मिळुन आल्याने व सदर ठिकाणी पाहणी केली असता
1) 10,000/- रु. किं.ची गावठी हातभट्टीची तयार गावठी दारु विविध रसायने वापरुन बनवलेली अंदाजे 100 लिटर प्रमाणे लोखंडी टिपाडमध्ये मिळुन आलेली, 2) 15,000/- रु.किं.चे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी वापरायचे विषारी कच्चे रसायन अंदाजे 300 रुपये लिटर प्रत्येकी 50 रुपये लिटरप्रमाणे निळ्या रंगाचे टाकीमध्ये असलेले, 3) 250/- रु.किं.चा हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारा गुळ अंदाजे 05 किलो प्रत्येकी 50 रुपये किलोप्रमाणे, 4) 2,000/- रु. किं. चा पांढ-या रंगाचे विषारी नवसागर अंदाजे 02 किलो वजनाचा प्रत्येकी 2000 रु. किलो प्रमाणे असा एकुण 27,250/- रुपये किंमतीचा गावठी हातभट्टीची तयार दारु व त्यास लागणारे विविध रसायने या सह मिळुन आल्याने पो.हे.कॉ/1380 वाघमोडे यांनी जागीच पंचनामा करुन नष्ट केला आहे.

सदर घटनेबाबत पो.कॉ/967 ज्ञानेश्वर सुदामदेव रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे गु.र.नं.658/2026 भा. न्याय संहिता कलम 123, 223, 275 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(e), 65(f), 65(d), 65(c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.एम. सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरु साहेब शेवगाव उपविभाग, शेवगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात पो.हे.कॉ/1380 बाबा वाघमोडे, पो.कॉ/967 ज्ञानेश्वर रसाळ, होमगार्ड/वायकर, म.पो.कॉ/1361 गीता पवार, चा.पो.कॉ/पडोळे यांनी केली आहे.

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहान करण्यात येते अशा प्रकारचे व्यवसाय करणारे इसमांबाबत काही माहिती असल्यास नेवासा पोलीस स्टेशन लँण्ड लाईन नंबर 02427-241233 यावर तसेच डायल 112 या प्रणालीवर फोन करुन माहिती द्यावी.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







