
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे घरफोडी करून लाखोंचा ऐंवज लंपास झाला आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २२ रोजी रात्री ९.३० ते दि. २३ रोजी पहाटे ५.४५ वाजेच्या दरम्यान माका येथील आखाडे वस्तीवर कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराच्या खिडकी कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला.

कपाटाच्या आतील सामानांची उचकापाचक करत त्यातील सात लाख पंधरा हजार किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह ऐंशी हजार रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

अभिषेक साहेबराव आखाडे (वय.३१) रा. देडगाव रोड आखाडे वस्ती माका यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा र. नं. ३२६/२०२६ बिएन एस चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव हे करत आहेत.








