घोडेगाव —माहेरहून १० लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह १६ जणांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रतिभा महेश दरंदले (वय २६, रा. खरवंडी रोड, सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश नामदेव दरंदले याच्यासह सासरच्या सासरे नामदेव विठ्ठल दरंदले,सासु लता नामदेव दरंदले रा. सोनई,नंदायी सचिन बाबासाहेब शेंडगे , ननंद सुशमा सचिन शेंडकर दोघे राहणार कौठा,

मावस दिर सुशांत राजेंद्र डोंगरे, मावस सासू सुनिता राजेंद्र डोंगरे दोघे राहणार वडगाव गुप्ता, चुलत सासरे विजय सुखदेव दरंदले, मामी सासरे विठ्ठल डावखर रा. सोनई,मामी सासरे हरिश्चंद्र हनुमान काळे रा. तेलकुडगाव, मावस सासरे प्रकाश शंकर मरकड, अशोक शंकर मरकड दोघे राहणार कौठा, मध्यस्थी बाळासाहेब भाऊसाहेब राऊत रा. सोनई रमेश सुर्याभान म्हसे कल्पना रमेश म्हसे दोघे राहणार तांदुळवाडी ता. राहुरी, आबासाहेब दादासाहेब निमसे रा. सोनई या मंडळींनी फिर्यादीचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला.

तसेच तिच्या आई-वडिलांकडून जमीन घेण्यासाठी १० लाख रुपये आणण्याची मागणी करून तगादा लावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पैसे न आणल्यास शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार दि. १० ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सोनई येथील सासरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी दाखल फिर्यादी नुसार बिएन एस चे कलम ८५, ३५२, ३५१(२)(३)(५) अन्वये गुन्हा रजिस्टर दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब तागड करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







