इलेक्ट्रिक स्कूटीसह आकर्षक बक्षिसांची लयलूट; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कुकाणा : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे ‘होम मिनिस्टर – सोहळा स्त्री सन्मानाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘होम मिनिस्टर’ फेम शुभम मस्के यांनी आपल्या खास शैलीतील खुमासदार सूत्रसंचालनातून उपस्थित महिलांचे मनोरंजन केले. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हास्यविनोद, मनोरंजन आणि उत्साहाने संपूर्ण कार्यक्रमस्थळाचे वातावरण आनंदमय झाले होते.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. बंपर लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक स्कूटीचे बक्षीस सौ. कोमलताई खंडागळे यांनी जिंकले. प्रथम क्रमांकाचे फ्रिज हे बक्षीस सौ. अनिताताई मोटकर यांना, द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही सौ. प्रगतीताई डावखर यांना, तर तृतीय क्रमांकाचे एक ग्रॅम लाँग गंठण सौ. प्रियांकाताई आंबीलवादे यांना मिळाले.

चतुर्थ क्रमांकाचे वॉटर प्युरिफायर सौ. अमृताताई खराडे यांनी, पाचव्या क्रमांकाचा फॅन सौ. अर्चनाताई ससाणे यांनी, तर सहाव्या क्रमांकाचा मिक्सर सौ. सोनालीताई लोखंडे यांनी पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पैठणी साडी सौ. उषाताई पवार यांना देण्यात आली.

महिलांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध खेळ, आकर्षक बक्षिसे आणि आनंददायी वातावरणामुळे हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष ठरला.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. तेजश्रीताई सिद्धांत नवले लंघे पाटील यांनी केले. यावेळी नेवासा तालुक्यातील महिला भगिनी, कुकाणा ग्रामस्थ, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







