ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाजप

नेवासा फाटा – लक्ष्मी मंगल कार्यालयात नेवासा भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन आज (१०) करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आपल्या महायुतीचा उमेदवार नेवासा तालुक्यात निवडून आणल्याबद्दल सर्वांचे प्रथमत: अभिनंदन केले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडणुकीदरम्यान केलेल्या कामाची, अडचणींची व अनुभवाची चर्चा केली.

भाजप

याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलताना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोर बाळासाहेब मुरकुटे यांच्या सोबत काम करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध ठराव मांडला. त्यात असे म्हटले की, ज्या भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले, त्यांना बंडखोर मुरकुटेंप्रमाणेच भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये, असा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष आणखी बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला.

भाजप

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार लंघे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यात येईल, तसेच भविष्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा नेते ऋषिकेश शेटे विधानसभा संयोजक सचिन देसरडा,अशोक टेकणे, मनोज पारखे, एडवोकेट विश्वास काळे, डॉ.लक्ष्मण खंडाळे प्रताप चिंधे, सरपंच सतीश काळे,अंकुश धंधक, राजेद्र दराडे, संभाजी लोंढे, अंकुश काळे, अमृता नळकांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

भाजप

या बैठकीस लक्ष्मण मोहिते, प्रमोद घावटे, निरंजन डहाळे, राजेंद्र मते सतीश कर्डिले मनोज डहाळे,विलास बोरूडे, शिवाजी लष्करे, माऊली गंगावणे, नाना डौले , अब्दुल पठाण, आदिनाथ पटारे, आकाश कुसळकर, ऋषिकेश दारुंटे,पोपट शेकडे, निखिल जोशी, बाळासाहेब कोलते, श्रीकांत बर्वे राजेश कडु, अर्जुन कर्डिले,दिनेश पिटेकर, संतोष कुटे यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!