ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कौशल्य विकास संस्था

आपला जिल्हा – शिर्डी येथील शांती कमल हॉटेलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनासाठी राज्यभरातील कौशल्य विकास संस्था चालक उपस्थित राहणार असून या अधिवेशनात व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी तसेच नवीन संधी तसेच शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवरती तसेच चळवळी बाबत वैचारिक विषयांची चर्चा केली जाणार असून यात कौशल्य विकास संस्थांच्या विविध संघटनांची एक सुकानु समिती स्थापन करून त्या मार्फत इथून पुढचा लढा उभारण्यासाठी या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ या शासकीय बोर्डाच्या मान्यताप्राप्त अशा 2275 संस्था राज्यात कार्यरत असून या संस्थांना व्यवसाय करत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी तसेच वेगवेगळ्या ट्रेड मधील वेगवेगळ्या नवीन संधी याविषयी एकत्रित चर्चा करण्यासाठी शिर्डी येथे सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं.

कौशल्य विकास संस्था

या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आमदार सर्वश्री शिवाजीराव कर्डिले, आमदार श्री संग्राम भैया जगताप, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार श्री विठ्ठलरावजी लंघे, आमदार श्री अमोल जी खताळ, आमदार श्री. डॉ किरणजी लहामटे हे उपस्थित राहणार असून आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे आणि हेमंत जी ओगले यांनी अधिवेशनास आपल्या शुभेच्छा कळविले आहेत. या अधिवेशनास सर्व कौशल्य विकास संस्था चालकांनी उपस्थित राहण्यासाठी अधिवेशन संयोजन समिती अहिल्यानगर च्या सर्व सदस्यांनी आव्हान केले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कौशल्य विकास संस्था
कौशल्य विकास संस्था
कौशल्य विकास संस्था

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कौशल्य विकास संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!