ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खनिज

गणेशवाडी – अनधिकृत गौणखनिज उपसा व वाहतूकच्या विरोधात ‘मंडळ अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसात तालुक्यात दोन ठिकाणी कारवाई करत सहा ब्रास मुरूम मुद्देमालसह दोन डप्पर जप्त केले. विशेष, म्हणजे या दोन्हीही कारवाई महिला मंडळ अधिकारी आघाडीवर होत्या. जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ, नेवासाचे प्रांतधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा खुर्द, घोडेगाव, सोनई, कुकाणे, सलाबतपूर, भानसहिवरे, देडगाव, प्रवरासंगम, वडाळा बहिरोबासह सर्वच मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध गौणखनिज उपसा वाहतूक विरोधात नेवासे तालुक्यात मोहीम उघडली आहे.

खनिज

विशेष म्हणजे या दोन्हीही कारवाई महिला मंडळ अधिकारी सरिता मुंडे (भानसहिवरे ) तृप्ती साळवे (कुकाणे ), व संगीता पुंड (सलाबतपूर) यांनी केल्या. त्यांना पथकातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले आहे.
या पथकाने अनाधिकृत गौण खनिज उपसा व वाहतुकीच्या विरोधात पहिली कारवाई मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी खड्का फाटा परिसरात केली असून त्यात चार ब्रास मुरूमासह एक वाहन ताब्यात घेतले आहे. तर दुसरी कारवाई दि. २५ रोजी उस्थळ दुमाला हद्दीत करत त्यात दोन ब्रास मुरूमसह वाहन जप्त केले आहे. हि दोन्ही वाहने पथकाने ताब्यात घेत तहसीलदार निवास परिसरात जमा करण्यात आली आहे.

खनिज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खनिज
खनिज
खनिज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खनिज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!