ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बांगलादेशी

नाशिक युनिट अंतर्गत अहिल्यानगर पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याच्या अनुषंगाने कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही बांगलादेशी नागरिक हे जळगाव जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पाठपुरावा करताना अहिल्यानगर येथील पथक वरिष्ठांच्या आदेशान्वये जळगाव कडे रवाना झाले होते

बांगलादेशी

त्यादरम्यान त्यांना सदर बांगलादेशी हे अन्वा, तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील खडी क्रेशर वर कामास असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्यावरून सदर बाबत वरिष्ठांना अवगत करून त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे सदर माहिती ही दवीप छत्रपती संभाजी नगर चे प्रभारी अधिकारी यांना शेअर करून दोन्हीही पथकांनी संयुक्तपणे आज रोजी कारवाई करून खालील नमूद बांगलादेशी नागरिक यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरुद्ध पारध पोलीस ठाणे जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांगलादेशी

बांगलादेशी नागरिकांची नावे –
1) इमदाद हुसेन मोहम्मद उलीहामद उर्फ सिपन, 26 वर्ष, सध्याचा पत्ता आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना, कबीलमियारबाडी, थाना – शेनबाग, तालुका – काजिरखील, जिल्हा – नोवाखली, बांगलादेश

2) माणिक खान जैनुलब्दिन खान, 42 वर्ष, सध्याचा पत्ता कुंभारी तालुका भोकरदन जिल्हा जालना @ माणिकअली इद्रिसआली बेपारी, मुंशी कंदी, तालुका चारचंदा, जिल्हा शौखुलीपुर, थाणा – बेदरगंज, बांगलादेश

बांगलादेशी

3) हुमायू कबीर उलीहामद, 40 वर्ष, सध्याचा पत्ता – कुंभारी तालुका भोकरदन जिल्हा जालना, बांगलादेश पत्ता – कबीलमियारबाडी, थाना – शेनबाग, तालुका – काजिरखील, जिल्हा – नोवाखली, बांगलादेश

आरोपी क्रमांक दोन यातील आरोपी क्रमांक 2 माणिक खान हा आहिल्या नगर जिल्ह्यातील नगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 649/2023 भादवि कलम 420, 465,468,471 सह पारपत्र भारतात प्रवेश 1950 परिच्छेद कलम 3(A)6(A) परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 3(1) परकीय नागरीक कायदा 1946 कलम 14 अन्वये गुन्हयातील पाहिजे आरोपी आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बांगलादेशी
बांगलादेशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बांगलादेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!