आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील गावठी दारू अड्यावर पोलीसांनी छापा टाकून मुद्दे माल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की लोहारवाडी ते महालक्ष्मी हिवरे रोडवरील थोरात वस्ती जवळ अश्पाक निसार शेख (वय.४८) रा. चांदा हा त्या ठिकाणी विना परवाना गावठी हातभट्टी ची दारू विक्री करत असल्याची माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना मिळाली होती त्या नुसार पोलीसांनी त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे जाऊन छापा टाकला . त्या ठिकाणाहून तिन हजार रुपये किंमतीची तिस लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. पोलीस काॅस्टेबल प्रविण क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ४८३/२०२५ महा. दारू बंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर हे करत आहेत.

दारू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!