आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गोवंशीय

घोडेगाव— सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/संदिप मुरकुटे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहिद शेख, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, सागर ससाणे, रोहित येमुल, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे दोन पथके तयार करुन सदर पथकास गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

गोवंशीय


दिनांक १९ रोजी पहाटे पथकाने सोनई पोलीस स्टेशन हद्दीत, गोवंशीय जनावरांचे कत्तल करणा-यासाठी डांबुन ठेवणा-या इसमांची माहिती काढुन छापा टाकण्यात आला.
त्यामध्ये आसिफ आतीक कुरेशी, लियाकत इस्माईल कुरेशी, उबेद कुरेशी सर्व राहणार चांदा यांनी येथील कुरेशी मोहल्ल्यातील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने काही गोवंशीय जनावरांना झाडाला विना चाऱ्याची डांबून ठेवली होती. त्या ठिकाणाहून नव्वद हजार रुपये किंमतीची सहा गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात आली.

गोवंशीय

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा र. नं. १३८/२०२६ महाराष्ट्र पशु संरक्षण कलम ५(अ), १,९सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कलम ३,११प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी मात्र फरार झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कडुन या पूढे सतत अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे किरण कबाडी यांनी सांगितले
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

गोवंशीय
गोवंशीय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोवंशीय
गोवंशीय
गोवंशीय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोवंशीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!