
घोडेगाव–– अहील्यानगर संभाजी नगर रोडवरील घोडेगाव येथे दि. २० रोजी सायंकाळी ८.४५ वाजता झापवाडी शिवारातील मनिष पेट्रोल पंपावर पेट्रोल झिझेल भरण्यावरून लोखंडी राॅड,काठी, चाॅपर, तलवार ने राहुल लक्ष्मण ढेरे, संतोष किरण सोन्याबापु, अमोल सुनील या कामगारांना मारहाण करत जखमी केले.

तसेच दिवसभरात जमा झालेली रोख रक्कम साठ ते सत्तर हजार रुपये घेऊन पळून गेले. व जाताना शिवीगाळ दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर पंपाच्या आॅफीसची तोडफोड केली असल्याचे फिर्यादी राहुल लक्ष्मण ढेरे (वय.२७) रा. घोडेगाव यांनी दि. २१ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार आरोपी विश्वास डोळसे, वैभव छगन लोंढे, रा. घोडेगाव, व अनोळखी दहा ते बार यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. २१९/२०२६ बिएन एस चे कलम ११९(१), ११८(१), ११५(२), ३३३,३५२,३५१(२) (३), ३२४(४), (५), १८९,१८९(२), (४), १९०,१९१,(२), १९(३), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







