आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील सोनई येथे जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन वादाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधित पक्षकारांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींमध्ये चर्चा सुरू असताना तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गुन्हा


पोलिसांच्या नोंदीनुसार, फिर्यादी म्हणून कामकाज पाहणारे पोलीस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जमीन वादाच्या चर्चेदरम्यान अर्जदार अनिल भळगट यांनी आपली मागणी मान्य करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी अचानक डिझेलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या कृतीस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अनिल हेमराज भळगट (वय ६५), प्रशांत अनिल भळगट (वय ३४) आणि पवन अनिल भळगट (वय ३३, सर्व रा. मेन पेठ, सोनई, ता. नेवासा) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

गुन्हा


या घटनेमुळे पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.
घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित
पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब मानली जात असून, अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जमीन वादातून निर्माण होणारे तणावाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

गुन्हा

सहाय्यक पोलीस अधिकारी मोरे यांच्या दालनात एखादा ज्वलनशील पदार्थ (डिझेल) घेऊन कुणी कसे जावु शकते. संबंधित व्यक्तीने आत्मदहनाचा इशारा देवुन देखील वेळीच त्याला त्या पासून परावृत्त का करण्यात आले नाही. या वरुन सोनई पोलीसांच्या कार्यपद्धती वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!