आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वाळू

घोडेगाव– गणेशवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा अहील्यानगर चे किरण कुमार कबाडी यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत दि. २६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार सोनई ते गणेशवाडी शिवारात चार चाकी वाहनातून वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या नुसार गणेशवाडी शिवारात एम एच २०ईएल ७९९०,एम एच १६ एई ३२३५,एक विना क्रमांक असलेल्या वाहनातून शासकीय वाळू विना परवाना बेकायदेशीर रित्या वाहतूक करताना मिळुन आले.

वाळू

या मध्ये एकुण अठरा लाख साठ हजार रुपये किंमतीच्या मुद्दे मालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादी वरून संबंधित आरोपी किरण बाबासाहेब सिसोदे (वय.२५) रा. खलाल पिंपरी,विवेक दत्तात्रय शिंदे (वय.१९)रा.निपाणी निमगाव, आकाश तांबे (फरार) रा. पानेगाव, बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय.४२) रा. बहिरवाडी,राजु सुपनर रा. अंमळनेर (फरार), यांच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. २२६/२०२६ बिएन एस चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू

पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार हे करत आहेत. सदरची कारवाई ही अहील्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब नागरगोजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुयोग सुपेकर, पोलीस काॅस्टेबल रोहित येमुल यांच्या पथकाने केली.

वाळू
वाळू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!