
घोडेगाव— किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणामागे सावित्री व सत्यवान यांची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. सावित्रीने आपल्या निग्रहाने तसेच बुध्दीने यमराजाला प्रसन्न करून वडाच्या झाडाखाली मृत पावलेल्या आपल्या पतीचे प्राण परत मिळविले होते. या पातिव्रत्याच्या आणि त्यागाच्या सन्मार्थ हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते.

वडाचे झाड हे दीर्घयुष्य , स्थिरता आणि अखंड सम्रृध्दीचे प्रतीक आहे. असे मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी महीलांना मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी कीर्ती बंग ,पल्लवी बेल्हेकर ,मनीषा निमसे ,प्राजक्ता सोनवणे ,संगीता कोरडे , जोशना राजहंस ,योगिता गवळी ,पल्लवी आव्हाड ,संगीता ताकवणे सह महीला भगिनी उपस्थित होत्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







